महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..म्हणून अमरावतीच्या 'या' गावचे शेतकरी पेरणीच करत नाहीत - Farmers

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत. शेती पेरली तर रोही जनावरांचा त्रास होतो.त्यामुळे शेकडो शेतकरी आपली 500 हुन अधिक एकर जमीन पडीत ठेवतात.

अमरावतीतील या गावात शेतकरी पेरणीच करीत नाहीत

By

Published : Jul 17, 2019, 1:21 PM IST

अमरावती- मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई या गावातील शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत. शेती पेरली तर रोही जनावरांचा त्रास होतो. त्यामुळे शेकडो शेतकरी आपली 500 हुन अधिक एकर जमीन पडीक ठेवतात. मागील पाच वर्षापासून वन्य प्राण्यांनी या ठिकाणी उपद्रव सुरू केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ३ वर्षापासून आपली शेती न पेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या मजूरांना बसला आहे.

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत

वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे कंटाळलेल्या येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक निवेदने, मोर्चे, आंदोलने काढले परंतु सरकारने नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांना आश्वासना शिवाय हाती काहीच लागू दिले नाही. या गावात मोठमोठी बी-बियाणांची 11 दुकाने आहे. परंतु तिही पेरणी अभावी ओस पडलेली आहेत.

या परिसरातील नेर पिंगळाई हे एकटचे गाव नसून परिसरातील 17 गावात वन्य प्राण्यांनी हौदोस घातला आहे.जर शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही तर हे शेतकरी जगणार कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आम्ही यासाठी अनेकदा आंदोलने केली पण सरकार ने लक्ष दिले नाही.धरणाच्या पाण्यासाठी पालकमंत्री भांडतात आता त्यांचे सरकार आहे. त्यांनी या शेतकऱ्यांची मागणी मंजूर करावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details