महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाला हळद लागली...अन्ं पित्याने संपवले जीवन - Amravati Crime news

कुऱ्हा गावात मुलाचे लग्न काही तासावर येवून ठेपले असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भारत महावीर शिंगाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Amravati
शेतकरी आत्महत्या

By

Published : Feb 24, 2020, 9:52 PM IST

अमरावती- तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावात मुलाचे लग्न काही तासावर येवून ठेपले असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या शेतात गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. भारत महावीर शिंगाडे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की भारत शिंगाडे यांच्याकडे 2 एकर ओलिताची शेती आहे. भारत शिंगाडे यांना संतोष आणि आकाश अशी दोन मुलं आहेत. शिंगाडे यांचा मोठा मुलगा संतोषचे उद्या मंगळवारी लग्न पार पडणार होते. तर लहान मुलगा आकाशचे लग्न 27 फेब्रुवारीला होणार होते. दरम्यान, मुलांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, शिगांडे यांनी नेमकी ही आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details