अमरावती - ७० वर्षीय वृद्धाने त्याच्या शेतात रखवालदारीचे काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा विळ्याने गळा चिरुन खून केला. शुक्रवारी रात्री उशिरा रात्री एका बडनेरा पोलीस ठाण्याच्या ( Badner Police ) हद्दीत येणाऱ्या अकोली येथील संजीवनी नगर भागात ही घटना घडली. रंगपंचमीच्या रात्री या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सुनिल मालवे (४०, रा. जनुना) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी केली आरोपीला अटक
घटनेची माहीती मिळताच बडनेरा पोलिसांनी तत्काळ मारेकरी ( Badnera arrested accused in Amaravati ) वृध्दाला अटक केली. विठ्ठल अमृत काकडे ( ७० रा. निंभोरा, संजीवनीनगर ) असे अटक केलेल्या मारेकरी वृध्दाचे आहे. विठ्ठल काकडेने शहरातील अकोली भागात असलेल्या संजीवनीनगर परिसरातील एक शेत मक्त्याने कसण्यासाठी घेतले आहे. याच शेतात काकडेचा गोठा आहे. त्या ठिकाणी गुरे ठेवली आहेत. याच गुरांच्या रखवालदारीसाठी मागील दोन महिन्यांपासून मालवे यांना नोकरीवर ठेवले होते. दरम्यान काकडेसुध्दा गोठ्याजवळच राहत होता.
हेही वाचा-Mumbai : कुर्लात पुरी भाजी विक्रेत्याचे ग्राहकाशी भांडण; चिमुकलीसह वृद्धावर फेकले उकळते तेल