महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत शेतकऱ्यांने साडे चार एकर क्षेत्रात असलेल्या वांग्याच्या पीकावर फिरवले ट्रॅक्टर

साडे चार एकर भागात मोठ्या प्रमाणात लावलेल्या वांग्यांना भाव नसल्याने विनाकारण वांग्याची रखवाली करणे परवडत नसल्यामुळे तुषार गिरमकर यांनी शेतातील वांग्याच्या पीकावर ट्रॅक्टर फिरवले आहे. शासनाकडून मदत नाही कोरोनामुळे सद्या जिल्ह्यात तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आमच्या सारखे शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहे. कोरोनाची भीती असताना लस उपलब्ध नाही आणि शेतकऱ्यांना कुठली मदत मिळत नसताना आम्हाला शेती करणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी तुषार गिरमकर यांनी दिली आहे.

वांग्याच्या पीकावर फिरववांग्याच्या पीकावर फिरवले ट्रॅक्टर ले ट्रक्टर
वांग्याच्या पीकावर फिरवले ट्रॅक्टर

By

Published : May 22, 2021, 3:45 AM IST

Updated : May 22, 2021, 3:58 AM IST

अमरावती -कोरोनाचा संकट काळात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस आले असताना शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. अमरावती शहरालगत नवसारी परिसरात एका शेतकऱ्याने साडेचार एकर भागात लावलेल्या वांग्याच्या पीकावर ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे. सद्याच्या कठीण परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

वांग्याच्या पीकावर फिरवले ट्रॅक्टर
नवसारी परिसरात तुषार गिरमकर या शेतकऱ्याने साडे चार एकरमध्ये वांगी, पालक, घोळ, भेंडी या भाज्या लावल्या आहेत. रोज येणारा भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला नेतात. सद्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतमालाला उठाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. साडे चार एकर भागात मोठ्या प्रमाणात लावलेल्या वांग्यांना भाव नसल्याने विनाकारण वांग्याची रखवाली करणे परवडत नसल्यामुळे तुषार गिरमकर यांनी शेतातील वांग्याच्या पीकावर ट्रॅक्टर फिरवले आहे. शासनाकडून मदत नाही कोरोनामुळे सद्या जिल्ह्यात तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आमच्या सारखे शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहे. कोरोनाची भीती असताना लस उपलब्ध नाही आणि शेतकऱ्यांना कुठली मदत मिळत नसताना आम्हाला शेती करणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी तुषार गिरमकर यांनी दिली आहे.
Last Updated : May 22, 2021, 3:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details