अमरावती - पाणी आणि योग्य भाव मिळत नसल्यामुळे मुलाप्रमाणे जगवलेल्या संत्र्याच्या बागेवर कुऱ्हाड चालवून पूर्ण बाग तोडून टाकण्याची वेळ अमरावतीच्या शेतकऱ्यावर आली आहे. कैलास कनेर असे त्या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने आपल्या शेतातील तब्बल बाराशे संत्र्याच्या झाडावर कुऱहाड चालवली.
पाण्याअभावी संत्र्याच्या बागेला लावली कुऱहाड; शेतकरी चिंताग्रस्त - water leval
विदर्भात संत्र्याचे उत्पादन हे सर्वाधिक अमरावती जिह्यात घेतले जाते. मधुर गोडवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची पाण्याअभावी बिकट परिस्थिती झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नेर पिगळाई या गावातील कैलास कनेर या शेतकऱ्याकडे एकूण बाराशे संत्राचे झाडे आहेत.
विदर्भात संत्र्याचे उत्पादन हे सर्वाधिक अमरावती जिह्यात घेतले जाते. मधुर गोडवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची पाण्याअभावी बिकट परिस्थिती झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नेर पिगळाई या गावातील कैलास कनेर या शेतकऱ्याकडे एकूण बाराशे संत्राचे झाडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या झाडांचे पोटच्या मुलासारखे संगोपन करत आले होते, परंतु आज ही बाग तोडून टाकायची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे विहीर, बोर कोरडी पडली आहेत, त्यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेली ही बाग आज डोळ्यादेखत उद्धवस्त झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव, परतवाडा या तालुक्यात सर्वाधिक साडे सहा हजार हेक्टरवर संत्राच्या मोठया बागा आहे. यात वरुड तालुका हा ड्रायझोन असल्याने येथे हजार फूट बोर घेतली तरी पाणी लागत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. नोटबंदीनंतर कवडीमोल भावात विकलेल्या संत्रा पुन्हा भाव मिळेल, ही आशा शेतकऱ्यांची होती. परंतु, नेहमीप्रमाणे संत्रा हा कवडीमोल किमतीला विकावा लागला. गेल्या तीन वर्षांपासून नेर येथील अफसर शेख यांनी त्यात केलेला संत्रा बगीचा मात्र फळ द्यायच्या अगोदर पाण्याअभावी वाळायला लागला. बगीचा जगावा यासाठी त्यांनी दोन बोअर मारले, विहीर खोदली पण भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने त्यांच्याही पदरी निराशा आली. विदर्भात तापमानाचा पारा रोज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विहरीची पातळी ही खोल जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.