अकोला- तळ गाठलेल्या कापशी प्रकल्पातून गाळ उपसा करण्यात येत आहे. अनेक शेतकरी हा गाळ आपल्या शेतात घेऊन जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध होत असला, तरी गाळ टाकण्यासाठी त्यांना हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.
कापशी प्रकल्पातून गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग; मोजावे लागतात हजार रुपये - शेतात
कापशी प्रकल्पातून शेतकऱ्यांची गाळ उपसा करण्यासाठी लगबग सुरू आहे. हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांना हजार रुपये खर्च येतो.
उन्हाळ्यात अनेक प्रकल्प तळ गाठतात. त्यातील गाळ अनेक वर्ष काढण्यात येत नाही. त्यामुळे ते प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता कमी होते. परिणामी, अशा प्रकल्पातून गाळ उपसा करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेतले जाते. हा गाळ शेतात उपयोगी असल्याने शेतकरी तो गाळ नेतात. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिल्या जाते. परंतु, गाळ शेतात पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खासगी ट्रॅक्टर चालक हा गाळ पोहोचविण्याचे काम करतात. त्यांना एका फेरीमागे 10 ते 20 लिटर डिझल लागते. हे पैसे शेतकऱ्यांकडून घेतात. यावेळी त्यांचाही धंदा जोर धरतो. तर शेतकरीही उत्पन्न वाढीसाठी गाळ शेतात टाकतात. गाळ जरी मोफत भेटत असला, तरी मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे.