अमरावती: मुलीचं लग्न म्हटले की, सर्वप्रथम अनेकांच्या समोर येते ते आपल्या कुलदैवताचे नाव. आपल्या आजोबा पणजोबापासून परंपरेने चालत आलेल्या कुलदेवतांच्या नावाचा नाम उल्लेख लग्न पत्रिकेत सर्वप्रथम करण्यात येतो. परंतु अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील पक्षीमित्र अरुण सेवाने यांनी कुलदैवताचे नाव न छापता त्या ठिकाणी पर्यावरण वाचवा असा मजकूर छापून एक चांगला संदेश दिला आहे. त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. तब्बल 70 हजार रुपये खर्च करून त्यांनी दोन हजार जलपात्रे खरेदी करून त्यांनी मुलीच्या लग्न सोहळ्यात त्याचे वाटप केले आहे.
पर्यावरण वाचवण्याचा दिला संदेश:आपल्याला अभिप्रेत असलेले देव-दैवत किंवा संत यांचे नाव आणि फोटो यांचा प्रामुख्याने उल्लेख करून पत्रिका छापायची प्रथा आहे. त्या परंपरा फाटा देत त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील पक्षीमित्र अरुण सेवाने यांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी अन्न नासाडी थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, तर दुसऱ्या बाजूला पक्षी वाचवा जंगल वाचवा, पाणी आडवा पाणी जिरवा ,अशा प्रकारचा संदेश दिला आहे.
देवतांच्या व संतांच्या फोटोला फाटा:लग्न पत्रिकेमध्ये कुलदैवतांचे फोटो आणि नावांना प्राधान्य देत पत्रिका छापल्या जातात. लग्नकार्य उरकल्यानंतर त्या पत्रिका कचऱ्यामध्ये जातात त्यावरील फोटोला पण अप्रत्यक्ष कचऱ्यात टाकल्या जाते. अशातच संतांच्या नावाची व फोटोची अव्हेलना होते. संतांची व कुलदैवत यांचे महात्म्य कायम राखता यावे यासाठीच पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका छापताना त्या पत्रिकेवर कुठल्याही देवधर्माचे नाव किंवा फोटो किंवा संतांचे नाव किंवा फोटो यांना स्थान न देता, सरळसरळ पत्रिका पर्यावरणाला समर्पित केली आहे. फोटो व नावांच्या जागेवर सामाजिक संदेश प्रकाशित केले आहे.
मेहंदीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश:नवरीने दिला हातावरच्या मेहंदीतुन चक्क पर्यावरण संवर्धनाचा संदेश. प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी आपल्या मुलीच्या विवाह पत्रिकेतून पर्यावरण जागृतीचा अनोखा प्रयत्न केला होता. या विवाह पत्रिकेला प्रतिसाद देत नवरी मुलगी निकिता हिने हातावर काढलेल्या विवाह मेहंदीत पर्यावरण संवर्धन काळाची गरज असा संदेश लिहून पक्षी व वृक्ष यांना स्थान देवून पर्यावरण संवर्धनासाठी वडिलांच्या अखंड सेवेच्या कार्यात सहभाग घेतला. तर यातून पर्यावरण निगडित कार्यात संपूर्ण कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट दिसून येते.