अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हान येथील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यावर एका व्यक्तीने आठ फुटावर हॉटेल बांधकाम करत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे १०० वर्षांपासून असलेल्या पांदण रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने विलास देवके या शेतकऱयाने धामगाव रेल्वे तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
अमरावती: सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांचे उपोषण - agitaion
धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हान येथील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यावर एका व्यक्तीने आठ फुटावर हॉटेल बांधकाम करत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पांदण रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने शेतकऱ्याने धामगाव रेल्वे तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे.
यासंबंधी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वांरवांर पाठपुरावा करण्यात आला. तसेच वारंवार अतिक्रमण लक्षात आणून दिले. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालयासमोर ९ मे पासून आमरण उपोषण सुरू केले. जो पर्यंत पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार नाही, तो पर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रखरखत्या उन्हात उपोषण सुरू असून देखील प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.