अमरावती -अमरावती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची ( Amravati Law And Order ) परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल बोंडे ( Anil Bonde ) मामा अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर ( Akansha Thakur Appeal To Anil Bonde ) हिने केले आहे.
'भारताला सुपर पवार बनवायचे आहे' -भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. आम्हाला येथे शांतता आणि प्रगती हवी आहे. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे आणि भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या, असे आवाहनही आकांशा यांनी केले आहे.