अमरावती- विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याऱ्या सुलभा खोडके यांच्या विजयासाठी 'हाता'चा प्रचार करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले आहे. काल (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुलभा खोडके यांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.
हेही वाचा - मुख्यमंत्री म्हणतात...तर राहुल गांधींची सभा आयोजित करा
अमरावतीच्या शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहरप्रमुख डॉ. गणेश खारकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले यांनी आयोजित केली होती. बैठकीला आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके, माजी महापौर विलास इंगोले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी, सर्वांनी विरोधकांवर सडकून टीका केली आणि विजय मिळविण्याचा निर्धार केला.
हेही वाचा - चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण; गुन्हा दाखल