महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dr Babasaheb Amebdkar Jayanti: अमरावती विद्यापीठ येथे बाबासाहेबांच्या आयुष्यावर संशोधन; आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची माहिती उपलब्ध

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे 2006 मध्ये सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने अनेक संशोधकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची माहिती येथे उपलब्ध होते. विशेष म्हणजे या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध घटना संदर्भात अनेक विद्यार्थी, चिकित्सक अभ्यास करायला लागले आहेत.

Amravati University
अमरावती विद्यापीठ

By

Published : Apr 14, 2023, 7:43 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे बाबासाहेबांच्या आयुष्यावर संशोधन


अमरावती:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज भारतासह जगभरात साजरी केली जाते. अमरावती विद्यापीठ येथील अभ्यास केंद्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर संशोधनाचे विदर्भातील एक प्रमुख केंद्र बनले आहे.



या विषयांवर संशोधन: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे 2006 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र सुरू झाले. या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यावरील प्रचंड ग्रंथसाठा उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य आणि विचार तसेच पदवी अभ्यासक्रम देखील या ठिकाणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंबादेवी मंदिरातील मंदिर प्रवेश सत्याग्रह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यातील समन्वय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी विषयक कार्य, राष्ट्रीय उभारणीतील कार्य, जलविषयक कार्य, आर्थिक कार्य, पत्रकारिता आणि वास्तव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य वर्तमान स्थितीत कसे अपेक्षित आहे. याचा समन्वय जोडणारे संशोधन या अभ्यास केंद्रामार्फत संशोधकांच्या वतीने केले जात असल्याची माहिती या अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर संतोष बनसोडे दिली.



डॉ.आंबेडकर यांचा विभागात पाचवेळा दौरा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमरावती विभागात एकूण पाच वेळा दौरा केला. सर्वात पहिले 1942 मध्ये अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंगी सभा झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एका अधिवेशनानिमित्त ते अकोल्याला येऊन गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात पातुर्डा येथे विहिरीच्या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. अमरावतीला 13 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमरावतीला आले होते.

भाषण देताना मिळाली दुःखद बातमी: याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमरावतीकरांना संबोधित करीत असतानाच त्यांना त्यांचे भाऊ दगावल्याची तार मिळाली होती. मात्र त्यांनी ही दुःखद बातमी मिळाल्यावर देखील आपले भाषण थांबवले नव्हते. 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे विदर्भातील नेतृत्व डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले होते. डॉ. पंजाबराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांनी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षावर त्यावेळी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा अमरावतीला आले होते. अमरावतीसह संपूर्ण विदर्भासोबत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधात संदर्भातील संपूर्ण इतिहास अभ्यास केंद्रात उपलब्ध असल्याची माहिती देखील डॉक्टर संतोष बनसोड यांनी दिली.

हेही वाचा:Dr Babasaheb Amebdkar Jayanti डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दोन वेळा प्राण वाचवणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड

ABOUT THE AUTHOR

...view details