महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा राणा दाम्पत्याने केला सत्कार - मोर्शी

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे रविवारी अमरावती जिल्ह्यात होते. पहिल्यांदाच मंत्री म्हणून आल्याने त्यांचा मोर्शी विधानसभा मतदार संघात वरुड, मोर्शी, शेंदुर्जना घाट, हिवरखेड येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील या सर्वनियोजित सत्कार सोहळ्यापेक्षा युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार रवी राणा यांच्या शंकरगरस्थित निवासस्थानी आयोजित त्यांचा सत्कार सोहळा खास चर्चेचा विषय ठरला.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा राणा दाम्पत्याने केला सत्कार

By

Published : Jun 24, 2019, 2:20 AM IST

अमरावती- पहिल्यांदाच मंत्री म्हणून जिल्ह्यात आलेले राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने राणा दाम्पत्याने सत्कार केला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी कृषीमंत्र्यांचे औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा राणा दाम्पत्याने केला सत्कार

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे रविवारी अमरावती जिल्ह्यात होते. पहिल्यांदाच मंत्री म्हणून आल्याने त्यांचा मोर्शी विधानसभा मतदार संघात वरुड, मोर्शी, शेंदुर्जना घाट, हिवरखेड येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अमरावतीत शहर भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्ह्यातील या सर्वनियोजित सत्कार सोहळ्यापेक्षा युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार रवी राणा यांच्या शंकरगरस्थित निवासस्थानी आयोजित त्यांचा सत्कार सोहळा खास चर्चेचा विषय ठरला.

रात्री ११ वाजेच्या सुमारास डॉ. अनिल बोंडे हे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी औक्षण करून 'जय हो कृषिमंत्री' म्हणत बोंडे दाम्पत्यांचे स्वागत केले. यानंतर अनिल बोंडे यांना पुष्पहार घालून राणा दाम्पत्याने सत्कार केला. युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषीमंत्र्यांचा सत्कार केल्यावर आमदार राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अनिल बोंडे यांनी काही वेळ राणा दाम्पत्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. काही ठिकाणी बँक आणि तलाठ्यांच्या अपचनींमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, असे डॉ. अनिल बोंडे यावेळी म्हणाले. यावर्षी वरुण राजा कोपलेला आहे. समाधानकारक पाऊस अजूनपर्यंत झालेला नाही. जोपर्यंत जमिनीची आद्रता पुरेशी नाही तोपर्यंत पेरणी करू नये. तसेच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी कुठलाही वाईट विचार मनात आणू नये, असा कृषीमंत्री म्हणून माझा सल्ला आहे, असे डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details