अमरावती- फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तारादरम्यान अमरावती जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री पद रिक्त होते. त्याठिकाणी आता नवे पालकमंत्री म्हणून वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार व राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री
मागील महिन्यात फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारादरम्यान अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. यावेळी अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त होते. परंतु, आता नवे पालकमंत्री म्हणून डॉ. अनिल बोंडे हे अमरावती जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.

मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पुढे काम करायला केवळ ३ महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे अनेक आव्हाने नव्याने नियुक्त झालेल्या पालकमंत्री यांच्याकडे असणार आहे.