अमरावती - मागील अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली. यामुळे पावसाने शेती कामाला वेग आला आहे.
दमदार पावसाने बळीराजा सुखावला; अमरावती जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरुवात - धामणगाव
अमरावती जिल्ह्यात दोन दिवसापाूसन पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात सोयाबीन, तूर व कपाशी या पिकाला प्रथम प्राधान्य आहे. दरम्यान, जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने आणि पेरणी योग्य पाणी झाल्याने शेतकरी आता पेरणीसाठी जोमाने कामाला लागला आहे. शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची काही प्रमाणात पेरणी केली आहे. जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, वरुड, धामणगाव रेल्वे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पुढे आणखी दमदार पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या हिंमतीने सुरू केली आहे.
दरम्यान, सध्या अलीकडे ट्रॅक्टरने पेरणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बैलजोडीने शेती पेरणारे शेतकरी अल्प प्रमाणात शेतकरी आहेत. तर अमरावतीतील एका शेतात बैलजोडीने सुरू असलेल्या पेरणीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...