अमरावती -एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली, एखाद्या कार्यात त्याने विशेष प्राविण्य मिळवले, तर त्याच्या कामाची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अनेकदा मोठ्या मंचावर, हॉलमध्ये पार पडतो, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या सर्व प्रकाराला फाटा देत, थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येत आहे.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने आज राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट तिफणाची निर्मिती केल्याबद्दल जुनी भारवाडी येथील रहिवासी शेतकरी ज्ञानेश्वर डेहनकर यांच्यासह जिल्ह्यातील 15 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या हस्ते शेताच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी येथे एका शेताच्या बांधावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा सवाई, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, प्राध्यापक काळे माजी सरपंच सचिन राऊत यांची उपस्थिती होती.
'शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार'