महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटलांपेक्षा देशमुख श्रेष्ठ; अमरावतीमध्ये व्हायरल पत्रकामुळे वाद उफाळला

अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्यात थेट लढत आहे. तर लगतच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेनेचे राजेश वानखडे निवडणूक रिंगणात आहेत.

पाटलांपेक्षा देशमुख श्रेष्ठ

By

Published : Oct 20, 2019, 8:00 AM IST

अमरावती- महाराष्ट्रीय देशमुख विकास प्रतिष्ठानच्यावतीने एक पत्रक काढून पाटलांपेक्षा देशमुख श्रेष्ठ, अशा आशयाचे पत्रक व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती आणि तिवसा विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या ऐन 1 दिवसापूर्वी देशमुख-पाटील वाद उफाळून आला आहे.

अमरावतीमध्ये व्हायरल पत्रकामुळे वाद उफाळला

हेही वाचा - दिवाळीआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीची साफसफाई करा - स्मृती इराणी

अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्यात थेट लढत आहे. तर लगतच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेनेचे राजेश वानखडे निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी मतदान होणार असल्याने शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना महाराष्ट्रीय देशमुख विकास प्रतिष्ठानचे एक पत्रक प्रफुल अजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती आणि तिवसा विधानसभा मतदारसंघात व्हायरल झाले आहे.

देशमुख विकास प्रतिष्ठानचे पत्रक व्हायरल

हेही वाचा - 'अमरावतीमध्ये आठपैकी पाच आघाडीचे आमदार निवडून येतील'

या पत्रकावर एका बाजूला भाजपचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या कमळासह डॉ. सुनील देशमुख यांचे छायाचित्र असून दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे बोधचिन्ह पंजा आणि तिवसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार यशोमती ठाकूर यांचे छायाचित्र आहे. या पत्रकामध्ये पाटलांपेक्षा देशमुख श्रेष्ठ आहेत. तर राजकारण ही अस्सल देशमुखांची जहागिरी, वतनदारी राहिली असून त्यावर आता कुणब्यांनी अतिक्रमण करू नये, अशा स्वरूपाचा मजकूर असून शिवसेनेने पंचर जोडणाऱ्याला, पेंटरला उभे करून निवडून आणल्यामुळे देशमुखांची राजकारणातली मक्तेदारी कमी झाली होती, असा उल्लेख असून प्रकाश भारसाकळे, ज्ञानेश्वर धाने-पाटील आणि सुलभा संजय खोडके यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा - अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस; यंदाही हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

आज आपण काँग्रेसी असलो तरी अमरावती विधानसभा मतदारसंघात सुनील देशमुख आणि तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी साम-दाम-दंड- भेदाचा वापर करून देशमुखी अस्मिता जपावी, असे आवाहन या पत्रकाद्वारे अमरावती आणि तिवसा विधानसभा मतदारसंघातील देशमुखांना करण्यात येत असल्याचेही प्रफुल देशमुख यांनी नमूद केले आहे. या पत्रकामध्ये माळी समाजाबाबतही आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती आणि तिवसा मतदारसंघासह जिल्ह्यातील मेळघाट वगळता सातही मतदारसंघात देशमुख-पाटील वाद उफाळून येण्याची भीती निर्माण झाली असून याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details