अमरावती - राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील धामणगाव शहरात देखील वृक्ष लागवड सुरु आहे. परंतू यासोबतच शहराला पॉलिथिन व कचरामुक्त करण्याचाही संकल्प धामणगाव नगरपरिषदेने घेतला आहे.
अमरावतीतील धामणगाव रेल्वे शहर होणार पॉलिथिन मुक्त - धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे शहर कचरामुक्तीसाठी नगरपरिषदेने घरोघरी वृक्षभेट, कापडी पिशवी तसेच कचरा टोपली भेट दिली आहे. यासोबतच शहराला पॉलिथिन व कचरामुक्त करण्याचा ही संकल्प धामणगाव नगरपरिषदेने घेतला आहे.
घरोघरी कापडी पिशव्या दिल्या गेल्या
शहर कचरामुक्तीसाठी नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी घरोघरी वृक्षभेट, कापडी पिशवी तसेच कचरा टोपली भेट दिली आहे. त्यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शहर कचरामुक्त व्हाव व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी यावेळी केले.