अमरावती- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोट या गावात एका हरणाचा मृत्यू झाला आहे. हे हरण एका घराच्या अंगणात शिरले होते. यावेळी कुंपणाच्या बाहेर निघताना लोखंडी ग्रीलला अडकल्याने रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
पथ्रोट गावात हरणाचा मृत्यू, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज - amravati district
हरीण पाण्याच्या शोधात किंवा गावठी श्वानापासून बचाव करण्यासाठी गावातील घराच्या आवारात शिरले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. यावेळी हरणाच्या पोटात लोखंडी रॉड गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला, यातच हरणाचा मृत्यू झाला.
पथ्रोट या गावातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे सेवा निवृत्त शिक्षक देशमुख यांच्या घरासमोर ही घटना घडली. हे हरीण पाण्याच्या शोधात किंवा गावठी श्वानापासून बचाव करण्यासाठी गावातील घराच्या आवारात शिरले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे.
घरातून बाहेर पडताना घराच्या संरक्षण भिंतीवरून झेप घेताना हरणाचे पाय लोखंडी ग्रीलला अडकले. यावेळी हरणाच्या पोटात लोखंडी रॉड गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला, यातच हरणाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी याठिकाणी गर्दी केली होती.