महाराष्ट्र

maharashtra

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथील घटना

By

Published : Mar 29, 2019, 6:44 PM IST

तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस, असे म्हणत २१ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने धारधार चाकूने हल्ला केल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथे घडली आहे.

चाकुच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला

अमरावती - तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस, असे म्हणत २१ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने धारधार चाकूने हल्ला केला. अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चनू साबुलाल जामुनकर (वय २४) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिवसा-ढवळ्या घडलेल्या या घटनेने राज्यातील तरुण मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पीडित मुलगी व आरोपी चनू हे दोघेही एकाच गावातील राहिवासी आहेत. २५ मार्चला होळीनिमित्त पीडित मुलगी तिच्या काही मैत्रिणी व इतर महिलांसोबत 'फगवा' मागत होती. या दरम्यान ती कुपनलिकेवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी तिच्या जवळ गेला आणि, तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस अशी विचारणा करु लागला.

त्यानंतर आरोपीने अचानक त्या मुलीला जमिनीवर पाडून तिच्या डोळ्यावर, पाठीवर, पोटावर आणि मांडीवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेने आरडाओरडा केला. तेव्हा तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी आरोपीस अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान पाठलाग करत पोलिसांनी त्याला अटक केली. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीवर परतवाडा येथे उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details