अमरावती - 'आमच्या भागात तुम्ही दोघे कसे काय आले?', असा सवाल करत दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्यासमोर काही तरुणांनी दगडफेक केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बडनेरा येथील रहिवासी मोईस खान मुस्तफा खान आणि मोहमद अनस हे दोघे औषध घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, गोपालनगर लगत असलेल्या ज्योती कॉलनीत सोनू प्रमोदकुमार साहू याच्या घरात पाणीपुरी मिळत असल्याने हे दोघे ज्योती कॉलनी परिसरात गेले. यावेळी ज्योती कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चार जणांनी तुम्ही आमच्या भागात का फिरता? असा सवाल करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मोईस खान मुस्तफा खान यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर दोन्ही जखमींसह बडनेरा परिसरातील अनेकांनी बडनेरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.