अमरावती- मेळघाटातील धारणी शहराजवळील दिया फाट्याजवळ मंगळवारी पुन्हा एकदा नवजात बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या ८ दिवसांपूर्वीच स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या बालकाचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यूने ग्रस्त आहे. येथील बालमृत्यूंचा दर घटवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पूर्वीपेक्षा आता येथील बालमृत्यूचा दर घटल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, गेल्या ८ दिवसामध्ये अशा २ घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.