महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वाघप्रेमी' दाम्पत्य निघाले देशाटनाला; राष्ट्रीय प्राणी वाचवण्याचा देतायेत संदेश - GITANJALI DAS

रथिंद्रनाद दास आणि त्यांच्या पत्नी गीतांजली हे दोघे 15 फेब्रुवारीपासून घराबाहेर पडले आहे. या दाम्पत्याने सिक्कीम, बिहार, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश असा प्रवास करून हे दाम्पत्य आता महाराष्ट्रात पोहचले आहे.

अमरावती

By

Published : Jul 30, 2019, 7:27 PM IST

अमरावती- वाघ वाचवा, वाघ वाढवा...या उद्देशाने पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक 'वाघ'प्रेमी दाम्पत्य वाघ वाचवा, असा संदेश घेऊन देशाटनाला निघाले आहेत. सोमवारी या दाम्पत्याने जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील काही गावांना भेट दिली. वाघ वाचवा या उद्देशाने हे जोडपे दुचाकीवर स्वार होऊन आता महाराष्ट्रातून दक्षिणेकडील राज्यात जाण्यास सज्ज झाले आहे.

'वाघवेडे' दाम्पत्य निघाले देशाटनाला; वाघ वाचवण्याचा देत आहे संदेश

रथिंद्रनाद दास आणि त्यांच्या पत्नी गीतांजली हे दोघे 15 फेब्रुवारीपासून घराबाहेर पडले आहे. या दाम्पत्याने सिक्कीम, बिहार, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश असा प्रवास करून हे दाम्पत्य आता महाराष्ट्रात पोहचले आहे. देशातील सर्व राज्यात असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी हे दोघे वाघवेडे सोमवारी मेळघाटात होते. मेळघाटातील दोन-चार गावात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शाळेतील विद्यार्थ्यांशी हे दाम्पत्य वाघ संवर्धनाच्या विषयावर बोलले. आपल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत रथिंद्रनाद दास यांनी 'ईटीव्ही भारत' शी दिलखुलास संवाद साधला.

आजपर्यंतच्या प्रवासात सर्वात उत्तम आणि घनदाट जंगल, पहाडांनी वेढलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सर्वात उत्तम असे व्याघ्र प्रकल्प पाहायला मिळाले, असे रथिंद्रनाद दास म्हणाले. अमरावतीवरून हे दाम्पत्य थेट पुणे आणि नंतर मुंबईला जात आहे. मुंबईनंतर आम्ही दक्षिणेकडील राज्यात व्याघ्र प्रकल्पांना भेट देणार आहोत. या भेटीत एकूण 200 शाळेतील विद्यार्थी आणि 500 गावातील लोकांशी आम्ही वाघांसह इतर विषयांवर याबाबत संवाद साधणार आहोत. आमचा भारत दौरा 16 डिसेंबरला पूर्ण होणार असून पुढल्या वर्षी मी एकटा वाघांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या 12 देशांच्या दौऱ्यावर निघणार असल्याचे रथिंद्रनाद दास यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details