अमरावती -पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठे असलेले धरण जिल्हातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणाचे सर्व १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून यामधून प्रति सेकंद २ हजार १३२ घन मीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाने ओलांडली धोक्याची पातळी हे ही वाचा -अमरावती : चांदूर रेल्वे येथे व्यापाऱ्याची ६० हजारांची पिशवी पळवली
अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडल्यामुळे धरणाच्या मुख्य पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आष्टी, वर्धा कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अप्पर वर्धा धरणाचे पूर्ण 13 दरवाजे तब्बल एक मीटरने उघडण्यात आले असून 2 हजार 132 घनमीटर प्रतिसेंकदाने विसर्ग सुरू आहे. तर लोवर वर्धा प्रकल्पातील या धरणातील दरवाजे 45 सेंमीने उघडले आहेत. अप्पर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने वर्धा नदीची पाणी पातळी वाढल्याने वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा -अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली