महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागली; शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट - पेरणी

अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाने मागील २ आठवड्यपासून दांडी मारली आहे. त्यामुळे जमिनीशी संघर्ष करत उगवणारे बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब झाले. यावर्षी आधीच जून महिना खाली गेला. त्यामुळे शेतकऱ्याने कशीबशी पेरणी केली. परंतु, आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्याचे उभे पीक डोळ्यादेखत करपू लागले आहे. पाहूया यासंदर्भातील हा रिपोर्ट.

पावसाअभावी बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब होत आहेत

By

Published : Jul 18, 2019, 5:13 PM IST

Updated : Jul 19, 2019, 7:25 PM IST

अमरावती- मागील २ आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाने दांडी मारली. जमिनीशी संघर्ष करत उगवणारे बियाणे उगवण्यापूर्वीच जमिनीत खराब झाले. यावर्षी आधीच जून महिना खाली गेला. त्यामुळे शेतकऱ्याने कशीबशी पेरणी केली. परंतु, आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्याचे उभे पीक डोळ्यादेखत करपू लागले आहे. पाहूया यासंदर्भातील हा रिपोर्ट.

पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट, पाहा स्पेशल रिपोर्ट

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी गोपाळ भोजने या शेतकऱ्याने मागील वर्षी मोठ्या मेहनतीने कर्ज काढून शेती केली. परंतु, निसर्गाच्या लहरीपणाने त्यांच्या आशेची निराशा झाली. त्यामुळे निदान यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, या भाबड्या आशेने त्यांनी पुन्हा कर्ज काढून पेरणी केली. पण २ आठवड्यापासून पाऊसच गायब झाल्याने आज या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येण्याची वेळ आली आहे.

ही परिस्थिती एकट्या गोपाळ भजने या शेतकऱ्याची नाही. तर अखरेच्या घटका मोजत असलेल्या कपाशीच्या पिकात आज नाहीतर उद्या पाणी येईल, या आशेने डवरणी करणारे शेतकरी माणिक धामणकर यांचीही हीच व्यथा आहे. त्यांनी यावर्षी ३० हजारांचे कर्ज काढून आपल्या शेतात पराटीची लागवड केली. परंतु तेही आता अखेरच्या घटका मोजत आहे. आता सरकारनेच काही तरी मदत करावी, अशी मागणी ते सध्या करत आहेत.

अमरावती जिल्ह्यात एकूण ७ लाख २८ हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. त्यातील २० टक्के शेतकऱ्यांची अद्यापही पेरणीच व्हायची आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात २२२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु सरासरीच्या ६० टक्केच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच यावर्षी पाणीच नसल्याने धरणेही तहानलेलीच आहेत. भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखे ऊन तापत असल्याने जगण्याचा संघर्ष करत असलेल्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यात पिकांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने दांडी मारल्याने आता शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

Last Updated : Jul 19, 2019, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details