अमरावती- जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात 7 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अमरावतीत कोरोनाबाधितांचा आकडा 35 वर गेला आहे. 35 कोरोनाबाधितांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमरावतीत गुरुवारी आणखी 7 कोरोनाग्रस्त; जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 35 वर - खोलपूरी
कंवरनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्याची व्याप्ती किती असेल अशी भीती प्रशासनाला होती.कंवरनगर परिसरातील 78 वर्षीय महिलेसह, अनुक्रमे 47 आणि 48 वर्ष वयाचे दोन पुरुष कोरोनाबधित निघाले आहेत.
अमरावती शहरातील कंवरनगर परिसरात सोमवारी एकी पानटपरी चालकाचा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला होता. कंवरनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्याची व्याप्ती किती असेल अशी भीती प्रशासनाला होती.कंवरनगर परिसरातील 78 वर्षीय महिलेसह, अनुक्रमे 47 आणि 48 वर्ष वयाचे दोन पुरुष कोरोनाबधित निघाले आहेत.
खोलपुरी गेट परिसरात 27 वर्ष वयाची महिला आणि 39 वर्ष वयाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. हनुमान नगर परिसरात 45 वर्षाचा पुरुष आणि 65 वर्षाची महिला कोरोनाबधित आहे. अमरावतीतील हैदरपुरा, बडनेरा जुनी वस्ती, मासानगंज हे प्रतिबंधित क्षेत्र असून आज कंवरनगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणतात आले आहे.