अमरावती -जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा अक्षरशः हा कहर केला आहे. जिल्ह्यातील मोर्शी येथील घोरमाडे कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील तीनकर्ते पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने अख्खे कुटुंब उद्धवस्त झाले आहे. १६ दिवसात एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावतीत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू - कुटूंबीयांची प्रतिक्रिया घोरमाडे कुटुंबायावर कोसळला दुःखाचा डोंगर -
मोर्शी येथील पुनर्वसन कॉलनीतील सुनील घोरमाडे (५४), दीपक घोरमाडे (५०) व संदेश घोरमाडे (३०) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सुनील घोरमाडे यांच्या आईच्या पोटावर नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची देखभाल करण्यासाठी सुनील व दिपक घोरमाडे हे दोघे भाऊ नागपूर येथे रुग्णालयात गेले होते. त्या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अवघ्या १६ दिवसात घोरमाडे कुटुंबायावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन भाऊ व पुतण्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आता भीती व्यक्त होत आहे, या घोरमाडे कुटुंबाचा ट्रक, टिप्परचा व्यवसाय होता, कोरोनाने मृत्यू झाल्याने या तिघांच्या मृतदेहावर अमरावती येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - ओडिशा : मलकानगिरीमध्ये दोन बोटी बुडाल्या; एक ठार, सात बेपत्ता