महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर काँग्रेस आमदाराचे पोस्टर; भाजप नगरसेविकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - चांदूर

चांदूर रेल्वे शहरात प्रशासनाच्या टँकरवर चक्क स्थानिक काँग्रेसच्या आमदारांचे अथक परिश्रमाचे पोस्टर लागले आहे. त्यामुळे याविषयी भाजप नगरसेविका सुरेखा विलास तांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी तक्रार देऊन संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावतीत प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर काँग्रेस आमदाराचे पोस्टर

By

Published : Jun 6, 2019, 12:03 PM IST

Updated : Jun 6, 2019, 12:48 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिकडेतिकडे पाण्यासाठी हाहाकार माजत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असुन वेळोवेळी टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. मात्र, या पाणी पुरवठ्यालाही आता राजकीय गालबोट लागले आहे.

अमरावतीत प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर काँग्रेस आमदाराचे पोस्टर

या प्रशासनाच्या टँकरवर चक्क स्थानिक काँग्रेसच्या आमदारांचे अथक परिश्रमाचे पोस्टर लागले आहे. त्यामुळे याविषयी भाजप नगरसेविका सुरेखा विलास तांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी तक्रार देऊन संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

चांदूर रेल्वे शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. नियोजनशून्य चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या कारभारामुळे नागरिकांना प्रचंड पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. कमी-अधिक प्रमाणात पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र, शहरांमध्ये पाण्यावरून भांडणेही वाढली आहे. त्यातच अमरावतीच्या प्रशासनातर्फे शहराला काही पाण्याचे टँकर दिले. मात्र, त्या टँकरवर चांदूर रेल्वे येथील काँग्रेसचे आमदार यांनी स्वत:च्या नावाचे बॅनर लावले.

टँकरसाठी अथक परिश्रम केल्याचे दाखवत त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप सुरेखा तांडेकर यांनी केला. त्यामुळे शहरातील लोकांना पाण्याच्या राजकारणावरून अशावेळेस काँग्रेसच्या आमदारांच्या घृणास्पद कृत्याची चीड निर्माण होत आहे. प्रशासनाच्या निधीतून टँकरवर स्वतःचे नाव लावणे लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका सुरेखा तांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन केली आहे.

टँकरवर स्वत:च्या नावाचे आमदारांनी बॅनर कसे लावले याचे स्पष्टीकरण त्यांनी प्रशासनाला मागितले आहे. या प्रकरणामुळे शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Last Updated : Jun 6, 2019, 12:48 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details