अमरावती - सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. आता संपूर्ण जगाला आस आहे ती फक्त कोरोनावर येणाऱ्या लसीची. मात्र, अशातच बिहारमध्ये निवडणूक सुरू असल्याने भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये बिहारच्या जनतेला कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे जाहीर केल्याने संपूर्ण देशातून भाजपवर टीका होत आहे. हा भाजपचा चुनावी जुमला असल्याचे मत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
बिहारमध्ये मोफत कोरानाची लस, भाजपचा चुनावी जुमला - यशोमती ठाकूर
बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत वाटणे म्हणजे चुनावी जुमला आहे. तर भाजप देशातील इतर राज्यासोबत भेदभाव करत आहे. इतर ठिकाणी जनावरे राहतात का, असा संतप्त सवालही यशोमती ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर
देशाच्या इतर राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का असाही सवाल भाजपला देशभरातून उपस्थित केला जात आहे. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत वाटणे म्हणजे चुनावी जुमला असल्याचे म्हटले आहे. तर भाजप भेदभाव करत असून इतर ठिकाणी जनावरे राहतात का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
Last Updated : Nov 2, 2020, 3:17 PM IST