महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन : अमरावसी तहसील कार्यालयावर बैलबंडी घेऊन काँग्रेसचे धरणे - amravati agitation news

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शेतकऱ्यांचे आंदोलनाला पाठिंबा म्हणून केंद्र सरकारच्या दडपशाही प्रवृत्तीचा निषेध म्हणून तिवसा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर बैलबंडी घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

बैलबंडी
बैलबंडी

By

Published : Dec 4, 2020, 12:42 PM IST

अमरावती -केंद्र सरकारने शेतकरीविरोधी पारीत केलेल्या कृषी कायद्याविरोधात देश पातळीवर दिल्ली येथील सीमेवर मागील 8 दिवसापासून लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून केंद्र सरकारच्या दडपशाही प्रवृत्तीचा निषेध म्हणून तिवसा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर बैलबंडी घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारकडून दिशाभूल

केंद्रातील मोदी सरकारने राज्या-राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण, कंत्राटी शेतीला चालना आणि शेतमाल साठेबाजी या संबंधित तीन कायदे पास केले आहेत. शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. सरकार शेतकरीविरोधी असून याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश मध्यप्रदेश आदी राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनात आता अनेक राज्यातील शेतकरी उतरत आहेत.

राज्यात अंमलबजावणी नाही

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या आंदोलनात सक्रिय होत आहेत. तर महाराष्ट्र सरकारने या तीन कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने यावेळी वेळोवेळी आंदोलन करून या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी फुकारलेल्या दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा म्हणून तिवसा तालुक्यातदेखील तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस महिला काँग्रेस व त्यांचे पदाधिकारी यांनी तिवसा येथे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करून निषेध केला. मोदी सरकार व अमित शाहविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details