अमरावती- आपल्या घरातील काही वेळ जरी बत्ती गुल झाली तर आपण सैरावैरा होतो. परंतु ज्या गावात स्वातंत्र्यच्या ७० वर्षानंतरही विज पोहचू शकली नाही त्या गावाची आणि तिथल्या लोकांची परिस्थिती काय असेल याचा विचारही केला, तरी त्यांचं अंधारमय जीवन आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकते. अशीच कहानी आहे महाराष्ट्रातील अति दुर्गम भाग असलेल्या मेळघाटची. मेळघाटात आजही २० पेक्षा जास्त गावात वीजच पोहली नाही. त्यामुळे येथील लोक स्वातंत्र्य नंतरही अंधाराच्या काळ्याकुट्ट जोखडातून अद्याप मुक्त होऊ शकले नाही. मात्र आता या लोकाना अंधारातून मुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्याचे सुखावह चित्र धारणी तालुक्यातील चोपण गावात पाहायला मिळत आहे. ४०० ते ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा प्रकल्पा अंतर्गत 'मेडा'च्या साहाय्याने सोलर सिस्टीम (सौर ऊर्जेच्या) माध्यमातून १६१ घरात वीज पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे उशीरा का होईना या गावातील लोक अंधारमुक्त जीवन जगायला सुरुवात करतील.
अमरावती शहरापासून जवळपास १६० किलोमीटर वर धारणी तालुक्यात चौराकुंड ग्रामपंचायत अंतर्गत येणारे अतिदुर्गम हे चोपण गाव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प असल्याने या गावात पक्का रस्ता नाही. दळणवळण करण्यासाठी फार साधन नाही. त्यामुळे येथील जीवनमान अतिशय बिकट आहे. व्याघ्र प्रकल्पात हे गाव असल्याने या गावात विज देण्यासाठी अनेक परवानग्या लागणार होत्या. त्यामुळे या गावात वीज पोहचली नव्हती. परंतु वीज पोहचवण्यासाठी शासनाने मेडाच्या सहकार्याने हा सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला. तब्बल तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. आता हा प्रकल्प पूर्वतवास गेला असून या गावतील संपूर्ण १६१ घरात वीज पोहचली आहे. त्यामुळे या गावातील आदिवासी लोक आनंदी झाले आहे.
सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या या गावच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका या गावातील नागरिकांना असायचा. परंतु आता या गावात विज आल्याने तो धोका कमी झाला असल्याचे चोपण गावतील नागरिक सांगतात.
विद्यार्थ्यांना करता येईल अभ्यास -
चोपण गावात मागील सत्तर वर्षापासून वीजपूरवठा नव्हता. याचा मोठा प्रभाव शिक्षणावर पडला. मुलांना चुलीपाशी बसून अभ्यास करावा लागत होता. परंतु आता गावात विद्युत पोचल्याने त्याचा फायदा गावातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी होणार असल्याचं या गावातील विद्यार्थ्यांनी सांगितले.
चूल पेटवून घरात करायचो उजेड-