महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडिओः अस्वलाचे पिल्लू अडकले झाडावर; तीन तासांनी सुखरुप उतरले - कर्मचारी

मेळघाटातील धुळघात रेल्वे ते चेंडू गावादरम्यान असलेल्या कटसावरच्या झाडावर अस्वल सोबत तिचे पिल्लूही चढले. काही वेळात अस्वल झाडावरून खाली उतरली. मात्र तिच्या पिल्लाला झाडावरून खाली उतरणे जमले नाही. सुमारे साडेतीन तास अस्वलाच्या पिल्लाने जिकिरीचे प्रयत्न केले. तेव्हा त्याला झाडावरुन खाली उतरण्यात यश आले.

झाडावर अडकले अस्वलीचे पिल्लू

By

Published : May 26, 2019, 6:22 PM IST

अमरावती- मेळघाटातील धुळघात रेल्वे ते चेंडू गावादरम्यान असलेल्या कटसावरच्या झाडावर अस्वल सोबत तिचे पिल्लूही चढले. काही वेळात अस्वल झाडावरून खाली उतरली. मात्र तिच्या पिल्लाला झाडावरून खाली उतरणे जमले नाही. सुमारे साडेतीन तास अस्वलाच्या पिल्लाने जिकिरीचे प्रयत्न केले. तेव्हा त्याला झाडावरुन खाली उतरण्यात यश आले. दरम्यान वाहतुकीच्या मार्गावर हा थरार अनेकांनी अनुभवला.

झाडावर अडकले अस्वलीचे पिल्लू


मेळघाटात अतिशय दुर्गम अशा धुळघात रेल्वे ते चेंडू गावादरम्यान डांबरी रस्ता आहे. रहदारीच्या या मार्गावर धुळघात रेल्वे लागत एका काटसवरच्या झाडावर सकाली 8 वाजण्याच्या सुमारास एक अस्वलाचे पिल्लू अडकले असल्याचे वनरक्षक अर्बट यांना आढळले. झाडावर अडकलेल्या आपल्या पिल्लासाठी अस्वल झाडाभोवतली फिरत असल्याचे पाहून या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांच्या मनात धडकी भरली.


दरम्यान, झाडावर अस्वलाचे पिल्लू अडकल्याची माहिती मिळताच धुळघात वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी अस्वल असलेल्या ठिकाणी पोहोचले. काटसराच्या झाडापासून काही अंतरावर रस्त्यालगत एका शेतात असलेल्या मचाणावर चढून वनकर्मचारी झाडावर असलेल्या अस्वालच्या पिल्लूकडे लक्ष ठेऊन होते. या दरम्यान अस्वल आपल्या पिल्लासाठी अनेकदा झाडाखाली आली. तेव्हा 11.30 वाजण्याच्या सुमारास अस्वलाच्या पिल्लाला झाडावरून खाली उतरण्यास यश आले. यानंतर अस्वलाचे पिल्लू आईसह जंगलात निघून गेला.

ABOUT THE AUTHOR

...view details