अमरावती विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन - airport
अनेक दिवसांपासून रखडलेल्या विमानतळाच्या कामांचे आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण आणि टर्मिनल टॅक्सी वे या कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून नव्या कामांचे भूमीपुजन केले
अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विमानतळाच्या कामांचे आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. विमानतळाची धावपट्टी रुंदीकरण आणि टर्मिनल टॅक्सी वे या कामांना आता झपाट्याने सुरुवात होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून नव्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विमानतळावर झालेल्या कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.