अमरावती -मेळघाटातील 'चिखलदरा स्कायवॉक प्रकल्प' केंद्र सरकारने अडथळा आणल्याने अपूर्ण राहिला आहे, याला राज्य सरकार जबाबदार नाही, अशी टोला महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांना नाव न घेता लगावला आहे. दोन दिवसांपासून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प आरोप केला होता. तसेच या स्कायवॉकला हवं तर बाळासाहेबांचे नाव द्या, असा उपरोधिक टीका नवनीत राणा यांनी केली होती.
'केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रकल्पात अडथळे' -
आज अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा येथील स्कायवॉकची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी 'राज्य सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या आहेत. पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रकल्पात अडथळे आल्याचा आरोप केला.' तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील आमचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करु नये, अशी खरमरीत टीकाही त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केली.
यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा -
समृद्धी महामार्ग आणि गोरेवाडा राष्ट्रीय उद्यान यांना दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिल्यानंतर त्याच्या कामाला गती आली. त्यानंतर ती कामे लवकर पूर्ण झाली. त्यामुळे चिखलदरा येथील स्कायवॉकला हवं तर बाळासाहेबांचे नाव द्या, पण त्याच्या कामाला गती आणा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली होती. यासंदर्भातले पत्र त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहीले होते.
नवनीत राणा यांची प्रतिक्रिया जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक
जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक हा विदर्भाच्या नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे उभारला जात आहे. गोराघाट ते हरिकेन या दोन पॉइंटदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या स्कायवॉकची लांबी 500 मीटर असणार आहे. हा संपूर्ण स्कायवॉक अनब्रेकेबल काचेचा असणार आहे. याची उंची 1500 फुटापेक्षा अधिक असेल. तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून देशातीला पहिला असा स्कायवॉक नावारूपाला येत आहे. या स्कायवॉकच्या निर्मितीनंतर मेळघाट व चिखलदरा मधील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
हेही वाचा -इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई