अमरावती -शहरात जुन्या महामार्गावर ऑक्सीजन पार्कलगत धावती कार अचानक पेटल्याने खळबळ उडाली आहे. कारने पेट घेताच चालकाने कारच्या बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हे ही वाचा -मुंबई-नाशिक महामार्गावर 'द बर्निंग कार', पाच लाखांची रोकड जळून खाक

शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चपराशीपुराकडून यशोदानगरकडे येणाऱ्या कारला ऑक्सीजन पार्क लागत अचानक आग लागली. कारने पेट घेतल्याचे लक्षात येतात कारचालक राहुल हुमणे यांनी कारच्या बाहेर उडी घेतली. चालकाव्यतिरिक्त इतर कोणीही कारमध्ये नव्हते. ऑक्सीजन पार्कलगत कार पेटल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. काही वेळातच कारला लागलेली आग विझवण्यात आली. या दरम्यान फ्रेझरपुरा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जुन्या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही अंतरापर्यंत बंद करण्यात आली होती या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे.
हे ही वाचा -डोंबिवलीत बर्निंग कारचा थरार; आगीत जळून खाक