महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत मार्डीमार्गावर कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठालगत मार्डी मार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

अपघातात कारची दुर्दशा

By

Published : Feb 17, 2019, 6:34 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठालगत मार्डी मार्गावर आज दुपारी भरधाव वेगात असणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक दुचाकीस्वार आणि कारचालक गंभीर जखमी झाले.

फ्रेजरपुरा परिसरातील रहिवासी भुरू इम्रान चौधरी (वय ५२) असे मृताचे नाव आहे. तर फिरोज सुभान तालीवले असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. मार्डीकडून (एमएच. २७ बी. झेड. १४४९) कार भरधाव वेगात येत असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच. २७ बी. एम. ८१६०) दुचाकीला धडक देऊन कार एका झाडावर जाऊन आदळली.

अपघातात कारची दुर्दशा
या अपघातात भुरू इम्रान चौधरी घटनास्थळीच ठार झाले. तर, त्यांच्यासोबत दुचाकीवर असणारे सुभान तालीवले हे गंभीर जखमी झाले. कार चालकही या अपघातात गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून गडगेनगर पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details