अमरावती -महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या धारणी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या तस्करी होत असल्याचे पुढे आले आहे. अशीच एक गांजा तस्करी बाबत गुप्त माहिती धारणी पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून दोन युवकांना गांजा तस्करी करताना पकडून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती ते धारणी रस्त्याने येणाऱ्या पल्सर MH 27 AN0235 या दुचाकीवर दोन युवक तब्बल 42 किलो गांजा तस्कर करत आहे. अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन आणि धारणी पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फरतडे तसेच पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 42 किलो गांजा व पल्सर मोटरसायकल जप्त करून त्यांना अटक केली आहे. अर्पित संजय मालवीय (रा. कवडाझिरी), सय्यद अली सय्यद हासम (रा. धारणी) अशी अटक केलेल्या तरूणांची नावे आहे. या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
धारणीत ४ लाख रूपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक
दोन्ही तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 42 किलो गांजा व पल्सर मोटरसायकल जप्त करून त्यांना अटक केली आहे. अर्पित संजय मालवीय (रा. कवडाझिरी), सय्यद अली सय्यद हासम (रा. धारणी) अशी अटक केलेल्या तरूणांची नावे आहे.
धारणी गांजा