अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धारणी ते अकोट मार्गावरील बेलकुंड जवळ एका खासगी बसचा अपघात झाला. अपघातात चालकासह 31 जण किरकोळ जखमी झाले आहेत. याच मार्गावर 14 सप्टेंबर रोजी सुद्धा असाच अपघात होऊन 28 प्रवासी जखमी झाले होते.
मेळघाटातील धारणी-अकोट मार्गावर खासगी बस उलटली; 31 प्रवासी जखमी - मेळघाट व्याघ्र प्रकल्प
धारणी ते अकोट मार्गावरील बेलकुंड जवळ एका खासगी बसचा अपघात झाला. अपघातात चालकासह 31 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अमरावतीच्या मेळघाट मधील अकोट - धारणी हा महत्वपुर्ण मार्ग आहे. हा मार्ग गुगामल वन्यजीव अरण्यातून जातो. या मार्गावर ढाकना, बेलकुंड, कोकटु, धारगड, सोमठाना, खटकाली आणि वाण ही स्वतंत्र नियत क्षेत्रे आहेत. हा भाग अति संरक्षित जंगलात मोडतात. या जंगलात प्राण्यांचा मुक्त संचार व आश्रयस्थान असल्याने मानवी हस्तक्षेप व प्रवेशबंदी नाकारण्यात आली आहे, असे असले तरी सुद्धा या जंगलातुन दरोरोज मोठ्या प्रमाणावर खासगी बसची अवैध वाहतूक सुरूच आहे. यातूनच हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.