अमरावती -एका आईची व तिच्या मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेब आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. ७ डिसेंबर रात्री ९च्या सुमारास चांदुर बाजार शहरातील गुलाबराव महाराज नगरात घडली आहे. माधुरी गजानन चिंगणगुढे (वय ३५) आणि ऋषी चिंगणगुढे (वय ७) अशी मृतक दोघांची नावे आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात राहात होते. अशातच काल घराच्या मुख्य गेटसमोर काल या दोघांचाही मृतदेह आढळून आला असून नेमकी हत्या की आत्महत्या असा तपास पोलीस करीत आहे.
रक्ताच्या थारोळ्यात आई आणि मुलाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? पोलीस संभ्रमात
माधुरी गजानन चिंगणगुढे (वय ३५) आणि ऋषी चिंगणगुढे (वय ७) अशी मृतक दोघांची नावे आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात राहात होते.
भावाकडे चिठ्ठी?
रात्री नऊ वाजताच्या माधुरी चिंगणगुढे आणि त्यांचा मुलगा ऋषी या दोघांचाही मृतदेह त्यांच्या घराच्या समोरील गेटपुढे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी अवस्थेत या दोघांनाही उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक महिलेले भावाकडे चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. सदर चिठ्ठी व माहेरच्यांना बोलावल्याची माहिती पोलिसांनी दिली असून ही नेमकी हत्या आहे की आत्मघात? याबाबत पोलीस संभ्रमात असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळी ब्लेडचे पत्ते असल्याचेही छायाचित्रावरून दिसून येते.