महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाळ चित्रपटातील अमरावतीच्या चैत्याचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते देशाच्या राजधानीत गौरव - naal

अमरावतीचा चैत्या उर्फ श्रीनिवास गणेश पोकळे याला नाळ चित्रपटातील आपल्या कुशल कामगिरीसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ चा मराठी चित्रपटांसाठी सर्वात्कृष्ठ बाल कलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला होता. देशाची राजधानी दिल्लीत नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अमरावतीच्या चैत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

amravati
श्रीनिवास गणेश पोकळे

By

Published : Dec 26, 2019, 9:53 AM IST

अमरावती -नाळ चित्रपटातील आपल्या कुशल कामगिरीतून व गोड भाषेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेला अमरावतीचा चैत्या उर्फ श्रीनिवास गणेश पोकळे याला 4 महिन्यापूर्वीच राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ चा मराठी चित्रपटांसाठी सर्वात्कृष्ठ बाल कलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला होता. देशाची राजधानी दिल्लीत नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अमरावतीच्या चैत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीतील सामान्य कुटुंबातील चिमुकल्याने मिळवलेल्या या पुरस्कारानाने अमरावती शहराचे नाव पुन्हा एका नव्या उंचीवर नेले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्रीनिवास गणेश पोकळे

वऱ्हाडातील अमरावती शहराला सांस्कृतिकरित्या खूप महत्व आहे. याच अमरावतीमधील अतिशय गरीब कुटुंबातील श्रीनिवास पोकळे याला मागील वर्षी नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटात चैत्याची भूमिका करण्याची संधी दिली. कधी कुठल्या शाळेच्या नाटकात काम केल्याचा साधा गंधही नसलेल्या श्रीवास ने त्याच्या पहिल्याच चित्रपटात बजावलेल्या कामगिरीने सर्वांनाच भुरळ पाडली होती. त्याच्या याच उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्याला राष्ट्रीय फिल्म पुरस्कारचा मराठी चित्रपटासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details