महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा रथ सज्ज; अनेक दिग्गजांनी वापरला हा रथ...

शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मध्यप्रदेशात जनसंपर्कासाठी हा रथ वापरला होता. त्याची दुरुस्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हा रथ वापरण्यात येणार आहे.

By

Published : Aug 1, 2019, 2:01 PM IST

महाजनादेश

अमरावती- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यापूर्वी काढलेल्या यात्रांसाठी वापरलेल्या रथाचा वापर मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश' यात्रेसाठी करण्यात येत आहे. शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मध्यप्रदेशात जनसंपर्कासाठी हा रथ वापरला होता. त्याची दुरुस्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हा रथ वापरण्यात येत आहे.

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा रथ सज्ज; अनेक दिग्गजांनी वापरला हा रथ...

महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्टला नाशिक येथे होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून १ हजार ६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २ हजार ७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४ हजार ३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल.

ABOUT THE AUTHOR

...view details