अमरावती - येथील लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया आटोपतच धारणी येथे भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. विशेष म्हणजे मेळघाट हा राणा दाम्पत्यांचा गढ मानला जात असताना भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या जल्लोषाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मतदान आटोपताच भाजप-शिवसेनेचा धारणीत जल्लोष
अमरावती मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांची खरी भिस्त मेळघाटावर असल्याचे बोलले जाते. असे असताना धारणी शहरात सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आलेत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
अमरावती मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांची खरी भिस्त मेळघाटावर असल्याचे बोलले जाते. २०१४ च्या निवडणुकीतही मेळघाटच्या मतदारांनी नवनीत राणा यांना साथ दिली होती. आज झालेल्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात सर्वाधिक ६२.९१ टक्के मतदान मेळघाटात झाले.
असे असताना धारणी शहरात सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आलेत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दरम्यान, भाजप-सेनेच्या या जल्लोषाचे कारण मात्र स्पष्ट झाले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.