अमरावती- जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
डॉ. अनिल बोंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा वरुड येथे जल्लोष - डॉ. अनिल बोंडे
अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यात अमरावती जिल्ह्याचे वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. राज्यपालांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनिल बोंडे यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
दरम्यान, प्रविण पोटे यांचे मंत्री पद काढून अनिल बोंडे यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नवे समीकरणे तयार होणार आहेत.