महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसुख हिरेन व सचिन वाझे यांच्या अटकेनंतर रवी राणांचे धक्कादायक वक्तव्य - ravi rana latest news

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

badnera mla ravi rana
badnera mla ravi rana

By

Published : Mar 18, 2021, 3:34 PM IST

Updated : Mar 18, 2021, 3:40 PM IST

अमरावती - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना NIAने केलेली अटक या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

धागेदोरे सरकारभोवती

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीने प्रकरण संपणार नाही, तर सचिन वाझे यांना सरकार पाठीशी घालत आहे. या प्रकरणात पुढे मोठा भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारभोवती फिरत आहेत. तर मातोश्रीसुद्धा यात अडचणीत येणार आहे. सचिन वाझे यांनी NIAला दिलेली माहितीही पुढे मोठा भूकंप घेऊन येणार, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.

Last Updated : Mar 18, 2021, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details