ईटीव्ही भारत इम्पॅक्टः कामगारांच्या वेतन कपात प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडूंचे बैठक घेण्याचे निर्देश
अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत रतन इंडिया ही वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत येणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी हजारो कामगाराचे वेतन कपात केले आहे.
अमरावती- नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील रतन इंडिया या वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून लॉकडाऊन काळात हजारो कामगारांचे वेतन कपात केले गेले. या प्रकरणाची बातमी ईटीव्ही भारतने केली होती. या बातमीची दखल कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली. त्यांनी आज जिल्हा प्रशासन व कंपनीच्या व्यवस्थापनाला तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत कामगारांच्या या वेतन कपातीवर चर्चा होणार आहे.
अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत रतन इंडीया ही वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत येणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी हजारो कामगाराचे वेतन कपात केले. यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री यशोमती ठाकूर, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र तरीही तोडगा निघाला नसल्याची खंत कामगारांनी व्यक्त केल्यानंतर ईटीव्ही भारतने या कामगारांची व्यथा बातमीच्या माध्यमातून मांडली. त्यानंतर या बातमीची दखल कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली जिल्हा प्रशासन व कंपनी व्यवस्थापकांना संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे.