महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लक्षात ठेवा, कामचुकारांना दणका आणि काम करणाऱ्यांचे स्वागत!'

अमरावती जिल्ह्यातील अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात बच्चू कडू यांच्या विरोधात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याला बच्चू कडू यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

बच्चू कडू
बच्चू कडू

By

Published : Jan 4, 2020, 11:30 AM IST

अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. त्यांनी दर्यापूर येथील पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात पाठवला.

कामचुकारांना दणका आणि काम करणाऱ्यांचे स्वागत

हेही वाचा - नववर्षात शिर्डीत भक्तांची मांदीयाळी; आठ दिवसात साई चरणी 17 कोटींचे दान
या प्रकरणानंतर जिल्ह्यातील अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बच्चू कडू यांच्या विरोधात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याला बच्चू कडू यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही. जर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सेवा हमी कायद्यानुसार सेवा देत नसेल, तर तो माझ्या तावडीतून सुटू शकणार नाही. सामान्य नागरिकांना त्रास दिला तर मी कडक कारवाईचे समर्थन करेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details