अमरावती -संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी बच्चू कडूंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या
गेल्या काही दिवसात राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा पिकांच्या गळतीवर उपाय योजना व झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई द्यावी.
गेल्या काही दिवसात राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. संत्रा पिकांच्या गळतीवर उपाय योजना व झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई द्यावी. नुकत्याच झालेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकांची गळती झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे. संत्रा गळतीवर शेतकऱ्यांना उपाययोजना सांगण्यात यावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.