अमरावती- शहरापासून जवळच असलेल्या अंतोरा गाव परिसरातील एका नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात वारंवार मोठे पूर येतात. त्यात नाला अरुंद असल्याने तो नेहमीच फुटतो. त्याचप्रमाणे यंदाही हा नाला फुटून पावसाचे पाणी शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले बियाणे सडले काही वाहून गेले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. नाल्याच्या रुंदीकरनासाठी व खोलीकरणासाठी वारंवार जिल्हाप्रशासनाला व पालकमंत्र्यांना निवेदन देउनही हा प्रश्न निकाली न निघाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर त्याच नाल्याच्या पुरात सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.
तिबार पेरणीचं संकट..! अमरावतीच्या अंतोरा गावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा.. - अंतोरा शेतकरी आत्महत्या इशारा
गावातील अनेक शेतकऱ्यांनी १३ जून ला पेरणी केली होती. त्यानंतर लगेचच एक दोन दिवसात मुसळधार पाऊस आल्याने या नाल्याला पूर आला आणि ते पाणी शेकडो हेक्टर शेतात शिरल्याने टाकलेलं बियांन निघण्या आधीच खरडून गेले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पीक वर निघाले पण मंगळवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने मात्र होत्याचे नव्हते केले. त्यामुळे आता पुन्हा तिबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांन समोर आहे.
या गावातील अनेक शेतकऱ्यांनी १३ जून ला पेरणी केली होती. त्यानंतर लगेचच एक दोन दिवसात मुसळधार पाऊस आल्याने या नाल्याला पूर आला आणि ते पाणी शेकडो हेक्टर शेतात शिरल्याने टाकलेलं बियाणं उगवण्याआधीच खरडून गेले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. रोपटीवर आली पण मंगळवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने मात्र होत्याचे नव्हते केले. त्यामुळे आता पुन्हा तिबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांन समोर आहे. परंतु बँका कर्ज देत नसल्याने आता जमिन तिसऱ्यांदा पेरायची कशी? असा प्रश्न या शेतकऱ्यांन समोर उभा आहे. शासनाने तात्काळ या नाल्याचे काम करावे नाहीतर याच नाल्यात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशाराच संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे..
दरम्यान मंगळवारी झालेल्या पावसामूळे नाल्याला आलेल्या पुरामूळे शेकडो एकर पेरलेली जमीन दुसऱ्यादा खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी या भागाची पाहणी केली असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यानी केली आहे.