अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील राहिमापूर चिंचोली येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपताच गुणवंत मानकर या गावकऱ्यांने ग्राम सचिवाला शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप - गुणवंत मानकर यांनी सचिवाला केली मारहाण
मागील ५ महिन्यांपासून कागदपत्रे देण्यासाठी सचिव टाळाटाळ करत असल्याने गुणवंत मानकर यांनी सचिवाला मारहाण केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
राहिमापूर चिंचोलीतील मारहाण
मागील ५ महिन्यांपासून कागदपत्रे देण्यासाठी सचिव टाळाटाळ करत असल्याने गुणवंत मानकर यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुणवंत मानकर यांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -बीजमाता राहीबाई पोपरेंची 'पद्मश्री'नंतर पहिली मुलाखत 'ईटीव्ही' भारतला, पाहा काय म्हणाल्या..
Last Updated : Jan 26, 2020, 8:01 PM IST