महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - अमरावती जिल्हाधिकारी

वर्धा नदीपात्रातील वाळूचोरीबाबत तक्रारीची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी कौर यांनी काटेकोर कारवाई करण्याचे खनिकर्म विभाग व चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना दिले. त्यानुसार तहसीलदारांच्या समावेशासह चांदूर रेल्वे उपविभाग स्तरावर दोन पथके तयार करण्यात आली.

वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

By

Published : Apr 28, 2022, 12:50 PM IST

अमरावती -वर्धा नदीपात्रातील वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या निर्देशानुसार जिल्हा शोध बचाव पथकाच्या समावेशासह दोन स्वतंत्र जिल्हास्तरीय पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावर वाळू तसेच अवैध रेती उत्खननासाठी वापरलेल्या बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या बोटींचा उत्खनानासाठी पुन्हा वापर होऊ नये म्हणून जप्त बोटी महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 नुसार कारवाई होत आहे. जिल्ह्यात आता वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

कारवाईसाठी दोन पथक गठीत -वर्धा नदीपात्रातील वाळूचोरीबाबत तक्रारीची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी कौर यांनी काटेकोर कारवाई करण्याचे खनिकर्म विभाग व चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना दिले. त्यानुसार तहसीलदारांच्या समावेशासह चांदूर रेल्वे उपविभाग स्तरावर दोन पथके तयार करण्यात आली. चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या स्वतंत्र दोन पथकांत मंडळ अधिकारी, इतर महसूल अधिकारी व कर्मचा-यांचा, शोध बचाव पथकांच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला.

महसूल अधिकाऱ्याची असणार नजर - प्रथम मोहिमेमध्ये नायगाव येथे 7 बोटी व गोकुळसरा येथे 5 बोटी आढळून आल्या. पथकांनी पंचनामे करून बोटी जप्त केल्या व ग्राम दक्षता समितीकडे सोपवल्या. तथापि स्थानिक स्तरावर बोटींचा पुन्हा वापर करून अवैध उत्खननाचे प्रकार घडत असल्याची माहिती मिळताच पथकांनी पुन्हा कारवाई केली. दुस-या मोहिमेत पथकांना नायगाव रेतीघाटाच्या नदीपात्रात 135 ब्रास वाळू, तसेच तेथील शेजारील शेतात 78 ब्रास वाळू आढळली. नायगाव घाटाच्या शेजारी असलेल्या वरुड बगाजी याठिकाणी निम्न वर्धा प्रकल्पाच्या जुन्या कर्मचारी वसाहतीत 600 ब्रास अवैध रेतीसाठा आढळला. हे सर्व साठे जप्त करून स्थानिक मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी व कोतवाल यांच्या ताब्यात देऊन यावर तहसीलदारांना लक्ष ठेवण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोटी नायगाव घाटातून उचलून धामणगाव रेल्वेला तहसील कार्यालयात आणण्यात आल्या.

आणखी तीव्र कारवाईचा इशारा -महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 नुसार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर कारवाई होत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिली. याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख व त्यांच्या सहका-यांनी या कारवाईसाठी सहकार्य करीत असून येत्या काळात रेती चोरीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई तीव्र केली जाणार आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details