अमरावती- मे महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही भागात पाऊस झाला. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश या दिशेकडून उष्ण वारे वाहणार आहे. परिणामी जिल्ह्यासह विदर्भातील तापमान वाढणार आहे. 19 ते 25 मे पर्यंत पारा वाढण्याची शक्यता आहे.
अमरावतीत पारा 45 अंशाच्यावर जाण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
राजस्थान, मध्य प्रदेश या दिशेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावतीसह विदर्भातील तापमान वाढणार आहे.
विदर्भासह राज्यातील अनेक भागात उद्यापासून तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीकरासह विदर्भातील जनतेला उष्णतेच्या लाटेचा मोठा सामना करावा लागेल, असा अंदाज अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात उद्यापासून कमाल तापमानात वाढ होणारअसून 25 मे पर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान पोहचण्याचा अंदाज आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यात तापमान हे 47 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत उसळत्या लाटांचा अनुभव पाहता या दिवसांत सूर्य तळपत असतो. त्यामुळे 19 ते 21 मे या तीन दिवसांत सूर्य आग ओकणार आहे. म्हणून अमरावतीकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे.